20.01.2025 : न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवारी
न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवारी
मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता राजभवन मुंबई येथे होत आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन न्या. आलोक आराधे यांना दरबार हॉल येथे पदाची शपथ देतील.