18.01.2025 : राज्यपालांच्या हस्ते सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर सेंटरच्या विस्तार प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण
18.01.2025 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टच्या सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर सेंटरच्या विस्तार प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. ट्रस्टच्या आवारात कॅन्सर व्यतिरिक्त इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या केंद्राच्या छताच्या नविनीकरण प्रकल्पाचे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील राज्यपालांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी पॅलिएटिव्ह केअर सेंटरला भेट दिली व रुग्णांची विचारपूस केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पालिकेच्या वैद्यकीय संचालक डॉ. निलम आंद्राडे, ट्रस्टचे विश्वस्त, देणगीदार संस्थांचे प्रतिनिधी आणि वैयक्तिक देणगीदार उपस्थित होते.