12.01.2025: राज्यपालांचे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
राज्यपालांचे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
राजमाता जिजाऊ माँ साहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.