08.01.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न
08.01.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.जगदेश कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विजय माहेश्वरी, सिनेट सदस्य, विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि पदवी प्राप्त करणारे स्नातक उपस्थित होते.
दीक्षांत समारोहामध्ये एकुण २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १०५५६ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४१२८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ५२७३ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २५५७ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३६६, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १३२८, प्रताप महाविद्यालयाचे ७५९, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७९३ व आर.सी.पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन रिसर्च १४८ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली. गुणवत्ता यादीतील ११९ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले.यामध्ये ८७ विद्यार्थिनी व ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. या समारंभात १६४ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.