बंद

    31.12.2024: नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: December 31, 2024

    नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी 2025 या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना, राज्यातील जनतेला आणि सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांना सुखाचे, उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो.

    प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अशा विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याकरिता वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण नववर्ष ही उत्तम संधी आहे. हे स्वप्न साकार करताना उद्यमशीलता व संत विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे.

    महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक थोर लोकांची भूमी आहे. सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.