03.12.2024: उपराष्ट्रपतींचे आगमन – स्वागत
उपराष्ट्रपतींचे आगमन – स्वागत
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबईस्थित केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी संशोधन केंद्राच्या शताब्दी समारोहाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे पत्नी डॉ सुदेश धनखड यांचेसह आज मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.