बंद

    29.11.2024 : राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

    प्रकाशित तारीख: November 30, 2024
    राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

    राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसेच पोस्टरचे अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.

    कार्यक्रमाला जेष्ठ अर्थतज्ञ, लेखक व माजी खासदार डॉ नरेंद्र जाधव, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रविंद्र गरुड, भदंत भन्ते सदनानांद थेरो, उषा रामलू, शशिकला जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.