बंद

    26.11.2024: मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

    प्रकाशित तारीख: November 26, 2024
    26.11.2024: मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

    मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला.

    राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.

    यावेळी मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे व इतर देखील उपस्थित होते.