बंद

    19.11.2024: दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: November 19, 2024
    Governor offers floral tribute to Indira Gandhi

    दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०७ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांनी राजभवन येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना राष्ट्रीय एकात्मता शपथ दिली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

    देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची सर्वांनी शपथ घेतली.

    राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सह सचिव (प्रशासन) श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.