15.10.2024: राज्यपालांची सोलापूर येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
15.10.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आयएमए, बार असोसिएशन, वस्त्रोद्योग, चेंबर ऑफ कॉमर्स, खेळाडू, पत्रकार, पंढरपूर तसेच इतर देवस्थान प्रतिनिधी आदींशी चर्चा करुन जिल्ह्याच्या तसेच समाज घटकांच्या समस्या समजून घेतल्या. सुरुवातीला सोलापूर जिल्हा व शहर प्रशासनातर्फे राज्यपालांसमोर जिल्हा, सोलापूर शहर तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले तेली व सोलापूर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी राज्यपालांसमोर जिल्ह्य़ाबाबत तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर विकासासंदर्भात सादरीकरण केले. आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, यांसह विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज राज्यपालांशी जिल्ह्य़ातील समस्यांबाबत चर्चा केली.