11.10.2024: राज्यपालांची नांदेड येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
11.10.2024: आपल्या नांदेड जिल्हा दौऱ्यामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकार, तृतीयपंथीय, सामाजिक संघटना अशा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी नांदेड विश्रामगृह येथे संवाद साधला. सुरुवातीला राज्यपालांनी नांदेड येथील खासदार तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. संवाद सत्राला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार भिमराव केराम, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, माजी आमदार गंगाधरराव पटने उपस्थित होते.. या शिवाय विविध राजकीय पक्षांचे स्थानिक प्रतिनिधी देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्प तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांबाबत सादरीकरण केले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, यांच्यासह विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.