11.10.2024 – विजयादशमी निमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा
विजयादशमी निमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो.
यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.