09.10.2024: राज्यपालांची जालना जिल्हयामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
09.10.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रमुख, उद्योजक, साहित्यिक, क्रीडापटू व प्रशिक्षक तसेच माध्यमांचे प्रतिनिधींशी जालना जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली. सुरुवातीला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे आदींनी राज्यपालांची भेट घेतली. महिकोच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी उषा झेर, गणपती नेत्रालयचे डॉ ऋषिकेश नायगावकर, जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू व विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सुरुवातील जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपालांसमोर जालना जिल्ह्यासंबंधी सादरीकरण करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, आदी यावेळी उपस्थित होते.
09.10.2024: Governor C. P. Radhakrishnan discussed various developmental issues of Jalna district with people's representatives, heads of political parties, entrepreneurs, writers, sportspersons, coaches and media representatives at Government Guest House in Jalna. Former Union Minister Raosaheb Danve, MLA Babanrao Lonikar, MLA Rajesh Rathod, MLA Kailas Gorantyal, MLA Santosh Danve etc met the Governor. Mahyco's Chief Technology Officer Usha Zher, Dr. Rishikesh Naigaonkar of Ganapati Netralaya, national level athletes from the district and representatives of various media organisations also met the Governor. Earlier the district administration made a presentation about Jalna district before the Governor. Divisional Commissioner Dilip Gawde, Collector Dr. Shrikrishnath Panchal, ZP CEO Varsha Meena, SP Ajay Kumar Bansal, were among those present on the occasion.