04.10.2024 : राज्यपालांची बुलढाणा येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
04.10.2024 : विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दुपारी शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे लोकप्रतिनिधी, उद्योग, कृषी, क्रिडा व समाजकार्य्र क्षेत्रातील नामांकित व्यक्तींशी संवाद साधला. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, माध्यम प्रतिनिधी, रेड क्रॉस व वैद्यकीय संस्थांचे पदाधिकारी यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्य़ाच्या तसेज जनतेच्या समस्यांबाबत चर्चा केली. बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांसह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. श्वेता महाले, आ.संजय गायकवाड़, आ. संजय रायमुलवार, हर्षवर्धन सपकाल, माजी मंत्री सुबोध सावजी, उद्योजक राधेश्याम चांडक, आदींनी आज राज्यपालांची भेट घेतली.