25.09.2024: राज्यपालांचे सांगली जिल्यातील मिरज येथे आगमन
25.09.2024: पुणे व सातारा जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे सांगली जिल्हयातील मिरज येथे आगमन झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. आगमनानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.
25.09.2024: Governor C.P. Radhakrishnan arrived in Miraj in Sangali district after completing his Satara district tour. Guardian Minister of Sangali Suresh Khade welcomed him. The Governor was given a ceremonial Guard of Honour by the police on his arrival.