15.09.2024: उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे संविधान मंदिराचे उदघाटन
15.09.2024: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे संविधान मंदिराचे उदघाटन केले. यावेळी डॉ. श्रीमती सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. संस्थेच्या प्रांगणातून महाराष्ट्रातील ४३३ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील संविधान मंदिराचे देखील उपराष्ट्रपतींनी उद्घाटन केले.