07.09.2024: राज्यपालांचे क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन
राज्यपालांचे क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज शनिवारी ( दिनांक ७) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.