26.08.2024 : राज्यातील सर्व राज्यलोकसेवा हक्क आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
26.08.2024 : राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यातील सर्व विभागीय राज्यलोकसेवा हक्क आयुक्तांसह राज्यपालांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्रीवास्तव यांनी राज्यपालांना आयोगाच्या २०२२-२३ साली विधानमंडळाला सादर केलेल्या अहवालाची प्रत सादर केली. यावेळी लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे (पुणे), बलदेव सिंह (कोकण), अभय यावलकर (नागपूर), डॉ किरण जाधव (छत्रपती संभाजीनगर), डॉ नारुकुला रामबाबू (अमरावती), चित्रा कुलकर्णी (नाशिक) तसेच सेवा हक्क आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.