26.08.2024: राज्यपालांची राज्यातील अनुसूचित क्षेत्रात आदर्श आदिवासी गाव व स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ स्थापन करणे या विषयांवर बैठक
26.08.2024: राज्यातील अनुसूचित क्षेत्रात आदर्श आदिवासी गाव निर्माण करणे तसेच राज्यात स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ स्थापन करणे या विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित शासनाच्या विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीला आदिवासी विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांपैकी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास, स्वामीनारायण मंदिराचे तीर्थस्वरूप दास, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, नेरळ येथील ‘सगुणा बाग’चे संचालक शेखर भडसावळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.