23.08.2024:राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडू येथे तमिळ पेरायम पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडू येथे तमिळ पेरायम पुरस्कार प्रदान
तमिळ पेरायम पुरस्कार आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तामिळ विद्वान, साहित्यिक आणि तमिळ संस्थांना एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (SRMIST) डीम्ड युनिव्हर्सिटी, कट्टनकुलथूर, कांचीपुरम, तामिळनाडू येथे प्रदान करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक कुलपती डॉ टी आर पारिवेंदर, सह अध्यक्ष एस निरंजन, कुलगुरू डॉ सी मुथामिझचेल्वन, कुलसचिव डॉ एस पोन्नूसामी, तामिळ पेरायमचे अध्यक्ष डॉ कारू नागराजन, इस्टेट अधिकारी आर अरुणाचलम, अध्यापक, विद्यार्थी आणि निमंत्रित उपस्थित होते.
प्रोफे. एस मुथुलक्ष्मी यांनी लिहिलेल्या ‘तामिलिसाई’ या पुस्तकाला मुथ्थंडवर तामिलिसाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. माहिती व नभोवाणी मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचे उपसंचालक संजय घोष यांना पुस्तक प्रकाशनासाठी स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.