20.08.2024: राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ आंबेडकर स्मारकाची पाहणी
20.08.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सह भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भंते डॉ. राहुल बोधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे व विजय वाघमारे, वास्तशिल्पकार शशी प्रभू , मूर्ती शिल्पकार अनिल सुतार आदी उपस्थित होते.