14.08.2024: राज्यपालांचे एमआयटीने आयोजित सोशल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम-2024 च्या समापन सत्राला संबोधन
14.08.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने पुणे येथील कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या सोशल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम-2024 च्या समापन सत्राला संबोधित केले. राज्यपालांनी SLDP-2025 च्या युवा नेत्यांना 'सोशल लीडरशिप बॅटन' सुपूर्द केले. सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रम (SLDP) 2024 विविध विद्याशाखांमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक नेतृत्व मूल्ये रुजवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. MIT-WPU चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, आयर्न मॅन मेजर जनरल विक्रम देव डोगरा (निवृत्त), MIT WPU चे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, संचालक, डीन, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
14.08.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan presided over the valedictory session of the Social Leadership Development programm-2024 organised by MIT World Peace University at its Campus at Kothrud, Pune. The Governor handed over the 'Social Leadership Baton' to the Youth Leaders of SLDP-2025. The Social Leadership Development Program (SLDP) 2024 was held at MIT World Peace University to instill social leadership values in first-year students. Founder President of MIT-WPU Dr. Vishwanath Karad, Executive President MIT, WPU Rahul Karad, Iron Man Maj Gen. Vikram Dev Dogra, (Retd), Vice Chancellor of MIT WPU Dr. R.M. Chitnis, Direcotors, Deans, Faculty of Board and students were present.