01.08.2024: राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज विधानमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त राज्यपालांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पांजली पाहून अभिवादन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यपालांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व इतर अधिकारी उपस्थित होते.