26.07.2024 : कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथून मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या राज्यांसाठी तीन ऍम्ब्युलन्स रवाना करण्यात आल्या. यावेळी संबंधित राज्यांच्या सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना व प्रतिनिधींना ऍम्बुलन्सच्या प्रातिनिधिक किल्ल्या सोपविण्यात आल्या. बोरिवली येथील अथर्व फाउंडेशनच्या वतीने उत्तर पूर्वेतील उपरोक्त तीन राज्यांमधील माजी सैनिक तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या आरोग्यसेवेसाठी या ऍम्बुलन्स वापरण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष व बोरिवलीचे आमदार सुनील राणे, उपाध्यक्षा वर्षा राणे, कर्नल एस चटर्जी व १५ आसाम रेजिमेंटचे जवान व अधिकारी उपस्थित होते.