05.07.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा 109 वा स्थापना दिवस सपंन्न
05.07.2024: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा १०९ वा स्थापना दिवस पाटकर सभागृह, महर्षी कर्वे शैक्षणिक परिसर, मुंबई येथे संपन्न झाला. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी सन १९१६ साली याच दिवशी विद्यापीठाची स्थापना केली होती. यावेळी विषमुक्त शेती व देशी बियाणांच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु डॉ रुबी ओझा, कुलसचिव विकास नांदवडेकर, माजी कुलगुरु रूपा शाह व चंद्रा कृष्णमूर्ती, सुधीर ठाकरसी, अधिष्ठाता, अध्यापक तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठातील सर्वोत्तम महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी यांना भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच निवडक विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.