22.06.2024: राज्यपालांच्या हस्ते ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन’ या पुस्तकाचे प्रकाशन
22.06.2024: मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, अलिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या 'गेटवेज टू द सी - हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाले.मुंबईचा सागरी वारसा सांगणाऱ्या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी'च्या पुढाकाराने सदर पुस्तक संकलित करण्यात आले असून नामवंत इतिहासकार, लेखक, संशोधक, वास्तुरचनाकार यांनी लिहिलेल्या १८ प्रकरणांचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमाला मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन के डी बहल, व्हाईस ऍडमिरल (नि.) इंद्रशील राव, संपादिका डॉ. शेफाली शाह, सोसायटीच्या उपाध्यक्ष अनिता येवले, भारत सरकारच्या प्रकाशन विभागाच्या प्रतिनिधी संगीता गोडबोले व लेखक उपस्थित होते.
22.06.2024: Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'Gateways to the Sea - Historic Ports and Docks of Mumbai Region' at Raj Bhavan Mumbai. The book brought out by the Maritime Mumbai Museum Society is a compilation of authoritative articles on the history of various ports and docks of the Mumbai Region including Sopara, Vasai, Versova, Mahim, Alibag, Chaul etc. Historians, researchers, maritime experts, conservation architects and writers have contributed 18 chapters in the book. President of the Maritime Mumbai Museum Society Captain KD Bahl, Vice Admiral (Retd) Indrasheel Rao, Editor Dr Shefali Shah, Vice President Anita Yewale, Publications Division representative Sangeeta Godbole and the contributing writers were present.