31.05.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचा प्लॅटिनम ज्युबिली सोहळा संपन्न
31.05.2024 : बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देण्यात येणारा 'के एस बसू जीवन गौरव पुरस्कार' थरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्षा व 'टीच फॉर इंडिया' कार्यक्रमाच्या संस्थापिका अनु आगा यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या असोसिएशनच्या प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील युवा उद्योजकांना उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला बीएमएचे अध्यक्ष किरण यादव, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, बीएमएचे माजी अध्यक्ष शैलेश हरिभक्ती यांसह प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार समितीचे सदस्य व पुरस्कार विजेते उद्योजक उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबिली विशेष 'इ ऍम्बीट' डिजिटल प्रकाशनचे उदघाटन करण्यात आले.