30.05.2024: एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ प्रदान
30.05.2024: राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन येथे ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. जभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या ‘प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यात’ राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. या सोहळ्याला भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, शासनाचे अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरु तसेच विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या चमूने एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.