06.05.2024: राज्यपालांच्या हस्ते लेखांकन व्यवसायाचे नियमन करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्राचे उदघाटन
06.05.2024: आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनाचे औचित्य साधून इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्राचे उदघाटन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाले. उदघाटन सत्राला आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सीएमए अश्विन दलवाडी, उपाध्यक्ष बी बी नायक, चर्चासत्र आयोजनाचे अध्यक्ष नीरज जोशी, डॉ. आशीष थत्ते, चैतन्य मोहरीर, संस्थेचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.