01.05.2024: ६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजारोहण
६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.