बंद

    30.04.2024: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

    प्रकाशित तारीख: April 30, 2024

    महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

    महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे आयोजित शासकिय सोहळयात बुधवारी (द‍ि. १ मे) सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करणार आहेत.

    मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

    महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून 8 वाजता तसेच आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन सकाळी ९ वाजता प्रसारित केल्या जाणार आहे.