13.04.2024 : दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ऍटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
१३.०४.२०२४ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे 'समावेशक अॅटलास इंडिया २०२४' चे प्रकाशन झाले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडने ब्रेल आणि सामान्य मजकुरात तयार केलेल्या टॅक्टाइल ग्राफिक अॅटलासमुळे दृष्टिहीन व्यक्तींना भारताचा आणि विविध राज्यांचा नकाशा समजण्यास मदत होईल. एनएबी इंडियाच्या मानद सरचिटणीस डॉ. विमल कुमार डेंगला, कार्यकारी अध्यक्षा पल्लवी कदम, मानद सचिव हरेंद्र कुमार मलिक, रमाकांत साटम, सुनील कपूर, गुंजना मालवीय उपस्थित होते.
13.04.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजोग्या 'इन्कलुसिव्ह ऍटलास इंडिया २०२४' या नकाशांच्या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने सदर ब्रेल तसेच सामान्य लिपीतून हा ऍटलास तयार केला आहे. ऍटलास प्रकाशन सोहळ्याला नॅबचे मानद महासचिव डॉ विमल कुमार डेंगला, मानद सचिव हरेंद्र कुमार मलिक, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, रमाकांत साटम, सुनील कपूर, गुंजना मालवीय आदी उपस्थित होते.