बंद

    21.03.2024: नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 21, 2024

    नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय सुरक्षा व रणनीती’ या विषयावरील अभ्यासक्रमात सहभागी होत असलेल्या नागरी सेवा व सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका चमूने आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी नॅशनल डिफेन्स कॉलेजचे वरिष्ठ संचालक रिअर एडमिरल संजय सचदेवा तसेच कोर्समध्ये सहभागी असलेले अधिकारी उपस्थित होते. यावेळी दहा भारतीय अधिकाऱ्यांसह ५ देशांमधील वरिष्ठ लष्करी अधिकारी देखील उपस्थित होते.