18.03.2024: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
18.03.2024: दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ४२ वा दीक्षांत समारोह आज महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पदमभूषण डॉ ज्येष्ठराज जोशी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय भावे, विद्यापीठाचे अधिकारी, अधिष्ठाता, विविध प्राधिकरणांचे सदस्य, माजी विद्यार्थी व अध्यापक उपस्थित होते. दीक्षांत समारोहात एकूण २१८८ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. एकूण २७ उमेदवारांना पीएचडी तर १७ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
18.03.2024: Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 42nd annual convocation of the Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli through online mode. Degrees were awarded to 2188 graduating students at the Convocation. While 17 candidates were presented Gold Medals, 27 candidates were awarded Ph.D. at the Convocation. Former Director of Institute of Chemical Technology Dr Jyeshtharaj Joshi, Vice Chancellor Dr Sanjay Bhave, officers of the University, Deans, Heads of Department, alumni and graduating students were present.