09.03.2024: राज्यपालांच्या हस्ते शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलामुलींना व्हीलचेअरचे वाटप
09.03.2024 : शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलामुलींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध मज्जा विकार तज्ज्ञ डॉ प्रेमानंद रमाणी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशनचे संचालक डॉ अनिल कुमार गौर, शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ.तुषार रेगे, मानद सचिव भूषण जॅक, वैद्यकीय सामाजिक कार्य विभागाच्या प्रमुख डॉ अंजना नेगलूर तसेच संस्थेचे पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.