29.02.2024: राज्यपालांची अमेरिकेतील तसेच राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक
29.02.2024: अमेरिका व महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढावे या दृष्टीने अमेरिकेतील तसेच राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंची तसेच विद्यापीठ प्रमुखांची बैठक राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाली. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एजुकेशन (IIE) या संस्थेच्या पुढाकाराने विद्यापीठ प्रमुखांच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, अमेरिकेतील १४ विद्यापीठांचे अध्यक्ष व प्रतिनिधी तसेच राज्यातील काही पारंपरिक विद्यापीठांचे कुलगुरु, शासनाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, अमेरिकन दूतावासातील सांस्कृतिक सहकार्य प्रतिनिधी सीता रायटर, IIE चे अध्यक्ष विवेक मनसुखानी, सह अध्यक्ष जेसन सिझ, आदी उपस्थित होते.
29.02.2024: A high level meeting between Heads of 14 Universities in the United States of America and Vice Chancellors of traditional state universities in Maharashtra was chaired by Maharashtra Governor and Chancellor of Universities Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. The meeting was organised by the Institute of International Education (IIE) to promote academic and research collaboration between the universities. U.S. Consulate General Mumbai Mike Hankey, Principal Secretary Higher and Technical Education Vikas Chandra Rastogi, Deputy Cultural Attache in US Consulate Sita Raiter, IIE Head Vivek Mansukhani, Co-President Jason Czyz and vice chancellors of selected traditional universities in Maharashtra were present.