21.02.2024 : राज्यपालांच्या हस्ते मुंबई अश्वमेध गायत्री महायज्ञाचे उदघाटन संपन्न
21.02.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर नवी मुंबई येथे मुंबई अश्वमेध गायत्री महायज्ञाचे उदघाटन संपन्न झाले. अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. यज्ञाच्या माध्यमातून पर्यावरण शुद्धी व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला आहे. कार्यक्रमाला अखिल विश्व गायत्री परिवाराच्या शैल जीजी, राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. चिन्मय पण्ड्या, गायत्री विद्यापीठाच्या प्रमुख शेफाली पंड्या तसेच देशविदेशातून आलेले गायत्री परिवाराचे सदस्य उपस्थित होते.