भाषण – 02.02.2024: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची राज भवन येथे बैठक संपन्न
02.02.2024: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव डॉ नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह सर्व विद्यापीठाचे कुलगुरू, संबंधित अधिकारी उपस्थित होते.