01.02.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे आयोजित २५ व्या भारतीय रंग महोत्सवाचे उदघाटन
01.02.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे आयोजित २५ व्या भारतीय रंग महोत्सव 'भारंगम'चे उदघाटन एनसीपीए मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या 'भारंगम' महोत्सव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उदघाटन सत्राला राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, 'भारंगम' महोत्सवाचे ब्रँड ऍम्बॅसेडार पंकज त्रिपाठी, ज्येष्ठ अभिनेते रघुवीर यादव, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी आदी उपस्थित होते. एकूण २२ दिवस १५ शहरांमध्ये चालणाऱ्या या नाट्य महोत्सवात १५० नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
01.02.2024: Maharashtra Governor Ramesh Bais presided over the inauguration ceremony of the 25th Bharat Rang Mahotsav 'Bharangam' organized by the National School of Drama at NCPA Mumbai. The Festival began with the group rendition of the 'Bharangam' Festival song penned by lyricist Swanand Kirkire. Chairman of National School of Drama and senior actor Paresh Rawal, Brand Ambassador of 'Bharangam' festival Pankaj Tripathi, senior actor Raghubir Yadav, Director of National School of Drama Chittaranjan Tripathi, eminent personalities from theatre, critics and alumni of NSDwere present. The 22 day long 'Bharangam' festival to be held in 15 cities will showcase 150 plays.