26.01.2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान
संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांची उपस्थिती
देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि २६) संध्याकाळी राजभवनाच्या हिरवाळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला मुंबई भेटीवर आलेले संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रासभेत भारताच्या राजदूत रुचिरा कम्बोज, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोर्हे, माजी राज्यपाल राम नाईक, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, आमदार अमीन पटेल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, कौशल्य विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, चित्रपट आणि कला क्षेत्रातील रोहित शेट्टी, भरत दाभोलकर, पहलाज निहलानी, सुदेश भोसले, अदनान सामी, शैलेश लोढा, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.