18.01.2024: राज्यपालांच्या हस्ते ‘वाग्धारा’ ‘नवरत्न’, ‘स्वयंसिद्ध’, ‘यंग अचिव्हर्स’ व जीवन गौरव सन्मान प्रदान
18.01.2024: साहित्य, संस्कृती, शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ व्यक्तींना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘वाग्धारा’ ‘नवरत्न’, ‘स्वयंसिद्ध’, ‘यंग अचिव्हर्स’ व जीवन गौरव सन्मान मुक्ती सभागृह अंधेरी मुंबई येथे प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक नंदलाल पाठक यांना ‘वाग्धारा जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्तीसगड येथील प्रसिद्ध पांडवाणी गायिका रितू वर्मा तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल यांना ‘वाग्धारा नवरत्न’ सन्मान देण्यात आला. पत्रकार व संपादक नरेंद्र कोठेकर, अभिनेत्री सीमा बिस्वास यांसह इतरांना ‘वाग्धारा’ स्वयंसिद्ध पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख, ‘वाग्धारा’चे अध्यक्ष डॉ वागीश सारस्वत, कार्यकारी अध्यक्ष दुर्गेश्वरी सिंह ‘महक’, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक विमल मिश्र आदी उपस्थित होते.