15.01.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई शाश्वत विकास शिखर परिषदेचा उदघाटन सोहळा संपन्न
15.01.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे मुंबई शाश्वत विकास शिखर परिषदेचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना मुंबई सस्टेनेबिलिटी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना ‘मुंबई शाश्वत विकास जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. डॉ दिवेश मिश्रा (पर्यावरण), अनुराधा पाल (स्त्री शक्ती महिला शास्त्रीय वाद्यवृंद), डॉ. हरिष शेटटी (आहार वेद) , अमृत देशमुख (स्वयं वाचन चळवळ) , सुजाता रायकर (साथ), लॉरेन्स बिंग (हॉकी), डॉ चिनु क्वात्रा (खुशिया फाऊंडेशन) यांना देखील राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई सस्टेनेबिलिटी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, हिंदुजा समुहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, टाटा ट्रस्टचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ शर्मा, विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेश सर्वज्ञ, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.