05.01.2024: राज्यपालांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले
05.01.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले तसेच पूजा व आरती केली. काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज व विश्वस्त धनंजय पुजारी यांनी राज्यपालांचा प्रभू श्रीरामाची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपलिका आयुक्त डॉ अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व इतर उपस्थित होते.
05.01.2024: Governor of Maharashtra Ramesh Bais visited the Kalaram Mandir in Nashik and performed puja and aarti. The Chief Mahant Acharya Mahamandaleshwar Sudhirdas Maharaj and Trustee Dhananjay Pujari of Kalaram Mandir were welcomed the Governor with an image of Lord Shriram, shawl and shrifal. State Sports and Youth Welfare Minister Sanjay Bansode, Divisional Commissioner Radhakrishna Game, Collector Jalaj Sharma, Nashik Municipal Corporation Commissioner Dr Ashok Karanjkar, Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal and others were present on this occasion.