बंद

    31.12.2023: नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: December 31, 2023

    नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल रमेश बैस यांनी २०२४ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

    स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण २०२४ या नववर्षाचे स्वागत करीत आहोत. भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल करीत आहे. या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रत्येकाने आपले योगदान दिल्यास देशाचा विकास सर्वस्पर्शी तसेच सर्वसमावेशक होईल.

    आगामी २०२४ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, निरामय जीवन व समृद्धी प्रदान करो, ही प्रार्थना करतो व सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.