29.12.2023 : ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
29.12.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या वतीने ‘मेरी मोटी मेरा देश’ या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अर्पिता राय, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजकुमार पाल आणि अभियानात सहभागी असलेले प्रतिनिधी उपस्थित होते.