12.12.2023: राज्यपालांच्या हस्ते नागपूर येथे ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या क्रमिक पुस्तकाचे प्रकाशन व ‘शिक्षण सेवा सन्मान’ प्रदान
12.12.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन, नागपूर येथे ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या क्रमिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ६ व्यक्तींना ‘शिक्षण सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आले. यावेळी निरुपमा देशपांडे, नरसिंग झारे, डॉ. अर्पिता करकरे, मोहन तेलंगी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव डॉ मुरलीधर चांदेकर, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य आयुक्त डॉ रामस्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर व व्यावसायिक प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी प्रामुख्याने उपस्थित होते.’महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तक निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या लेखक व संपादकांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.