09.12.2023: राज्यपालांच्या हस्ते अमरावती येथे राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन व्दारा आयोजित ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ प्रदान
09.12.2023 : अमरावती येथे राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनव्दारा आयोजित ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील पाच कर्तृत्वान महिलांचा ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, उद्योजिका स्नेहल लोंढे, बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर, प्रगतीशिल महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण पोटे, महिला आयोगाच्या सदस्या इंदूबाई शिंदे, राजमाता अहिल्या देवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे, श्रीमती सुरेखा ठाकरे आदी उपस्थित होते.
09.12.2023: Maharashtra Governor Ramesh Bais presented the Rajmata AhilyaDevi Stree Shakti Award to five distinguished women for their outstanding achievements in various walks of life at Amravati. Principal Secretary Labour Welfare Vinita Singhal, playback singer Vaishali Bhaisane-Made, entrepreneur Snehal Londhe, 'Shiva Chhatrapati State Sports Award' winner Reshma Punekar and progressive farmer Jyoti Deshmukh were given these awards at the award ceremony organized by Rajmata Ahilya Devi Foundation. Deputy Chief Minister Ajit Pawar, Women and Child Welfare Minister Aditi Tatkare, former MP Dr. Vikas Mahatma, Rajmata Ahilya Devi Foundation President Santosh Mahatme, Former Minister Praveen Pote and other dignitaries were present.