15.11.2023 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे ‘जनजातीय गौरव दिवस’ साजरा
15.11.2023 : राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नंदुरबार येथे ‘जनजातीय गौरव दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. नंदुरबार येथे आगमनप्रसंगी राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित, नंदुरबारचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार डॉ हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते.