03.11.2023: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांनी दिली सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
03.11.2023: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची 'सत्यनिष्ठा प्रतिज्ञा' दिली. देशाच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक प्रगती मध्ये भ्रष्टाचार मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी लाच न घेण्याची तसेच न लाच देण्याची, तसेच व्यापक समाज हितासाठी कार्य करण्याची शपथ राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिली. राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी उपस्थितांसमोर राज्यपालांच्या तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशांचे वाचन केले.
03.11.2023: Governor Ramesh Bais gave the ‘Integrity Pledge' to the staff and officers of Raj Bhavan on the occasion of 'Vigilance Awareness Week' at Raj Bhavan Mumbai. The Secretary to the Governor (In-charge) Shweta Singhal read out the messages of the Governor and Chief Minister Eknath Shinde on the occasion. Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, Comptroller of the Governor's Households Arun Anandkar and Deputy Secretary Ravindra Dhurjad were present.