01.11. 2023: छत्तीसगढ, मध्य प्रदेश व आंध्रप्रदेश या राज्यांचा स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन येथे साजरा
01.1१. 2023: एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे आज राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या माध्यमातून चित्रोत्पला लोककला परिषदेच्या वतीने छत्तीसगढ येथील कलाकारांनी लोकनृत्य व लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला तर मध्य प्रदेश येथील कलाकारांतर्फे कबीर गायन (माळवा शैली) सादर करण्यात आले. तेलुगु कला समितीच्या वतीने कुचीपुडी नर्तिका नादिया यांनी नृत्य सादर केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते चित्रपट कलाकार सुमन तलवार, चित्रोत्पला लोककला परिषदेचे संचालक राकेश तिवारी, तेलुगू कला समितीचे एम के रेड्डी व कुचिपुडी नृत्यांगना नादिया यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल व परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्र प्रदेश व तेलंगणा येथील कलाकार व निमंत्रित उपस्थित होते.